Sunday, March 9, 2014

BEING PANDITA MALINITAI

वाय गोपाळकृष्ण "इंद्रायणीकाठी" ह्या ब्लॉग चे प्रेरक … मूळतः हा ब्लॉग शास्त्रीय संगीता बद्धल सौ (शास्त्रीय गायिका ) आणि लेखक (dabbler ) ह्यांच्या संवादां   बद्धल असे- इंग्रजीत … ही संभाषणे गुवाहाटी शिलॉंग Highway NH ४० वर शनिवारी होत , आमची राजधानी weekend करिता मेघालय ला हलवतांना …. आईंच्या आग्रहा वरून त्यात मराठी ची भर पडली, आणि हिरव्या चाफ्या च्या शोधांत आम्ही निघालो! मुद्दा  असा, कि संगीताच्या मार्गा वरून भटक्ल्यास गोपाळ हिरमुसतात, म्हणून आज मराठी blog वर तेच प्रयोग करून पहिला, and transplanted the sapling to the English blog, he, he, he  …!

असो! नगाम्पु कुकी- आमचे ex-Army वाहन चालक, तैयार, Scorpio चा AUX stereo-pin ला connect करून ! नेहमी च्या सवयी प्रमाणे पहिले गाणे ''छा गये बादल नील गगन पर ''- निझामुद्दीन खान च्या वेड  लावणाऱ्या तबल्या करता, तद्नंतर मालिनी ताईंचा वेड लावणारा   चारुकेशी -ना वक्त कि सीमा, ना समय का बंधन …. आणि शेवटी- नया-बंगला सोडता-क्षणी- main course-ताईंचा मारवा/मालकौंस/सोहनी Lummawrie, Laitumkrah ला मध्यरात्री घरी पोहोचत पर्यंत ताई नेमकं शेवट ची तिहाई घेतांत -she is so systematic , you know -गणितज्ञ आहेत त्या …! आणि ज्या प्रमाणे आम्हां सर्वांना NH  ४० ची वळणोन-वळणे ठावुक आहेत, त्याच प्रमाणे त्या जादुई रचनांचे काने -कोपरे-लागे-बांधे सुध्धा … कारण जर आम्ही ह्या रस्त्या वर 'x' दा फिरकलो आहोत, तर (k+x) वेळा बंदिशांचे श्रवण केलेले …व्हेयर  'k' इज अ पॉझिटिव इंटिग्रल कॉन्स्टंट आणि 'x',  अ व्हैरिएबल   … 

आजचे मुद्दे थोडक्यात असे

(i) Youtube वर ताईंची भेट कृपया ऐकावी … artiste चे संगतकारांशी संबंध … कसे प्रेमाचे असावेत …

मालकौंस ऐकतांना आज आम्ही पेटी आणि तबल्या वर ध्यान केंद्रित करतो .…. बहुदा पं. थत्ते आणि पं. कामत असावेत … काय पण सुरेख ती पेटी …
UNBELIEVABLE FEATHER TOUCH



संतांनी सांगितले, आणि आपण सर्वांनी हे अनुभविले … जगात दोनच prime movers आहेत नाहीकां …? प्रेम आणि भीति … Love -Fear. . ? Recital मध्ये you can promote an unhealthy competitiveness…  that is antagonism …Fear …  the sort डांबरट Hairy Harry and Her Highness do  …  or it  could be goodwill amongst all men (which includes women, he, he …)

आमच्या सौं च्या मतां-प्रमाणे ताईंच्या ह्या मालकौंसात संगतकारांने सुद्धा अत्योच्च असे शिखर गाठले . Motivated संगतकार  संपूर्ण अनुभवाला एका अनोख्या पातळी वर नेवू शकतात… थत्ते किंवा वळवलकरां सारखे संगतकार … ते गुणवत्ते चे एक safety net- अगदी सर्कशी सारखे … निर्मीत करतात, ज्याच्या खाली main कलाकार घसरू शकत नाही … शेवटी vocal मध्ये team -work असणे सुखाचेच नाही का? मोठ मोठे कलाकार आपण notice करतो … पंडित भीमसेन असो वा  मालिनीताई … आपल्या तल्लीनतेत संगतकारानशीच स्मितहास्य करतात, audience शी नव्हे … ताईंच्या मालकौंसात तर ताईंने चक्कं दोघा संगतकारांना आपसात सवाल जवाब करण्याची संधी हि दिलेली !

ह्या प्रेमळ माहौल मुळेच ताईंचे recital is different ….ताई is different … आप सौ साल और  गायें…. ! 

(ii) पंडित भीमसेन हे एकदम मौलिक व्यक्तित्व …. original… left no photo-copies behind … only one or two smudgy carbon-copies … प्रश्ण असा कि का बऱ्याचदा सबंध बंदिशी-च्या-बंदिशी त्यांने एखाद्या अभंगा भोवती विणल्या?  उदा. अणुरेणिया थोकडा ( पुन्हा मालकौंस ) चे संपूर्ण version , जे त्यांने UK मध्ये माता निर्मला देवी (हरीश साळवे ह्यांच्या सख्या आत्याबाई) ह्यांच्या उपस्थितीत म्हंटले …किंवा  तीर्थ विठ्ठलं क्षेत्र विठ्ठलं… (अहीर भैरव- १९७५ चे सवाई गंधर्व, पुणे)

पंडितजी रसिकराज, आणि एका प्रस्तुतीत वेगवेगळे घटक अर्थात elements महत्वाचे असतात- राग प्रकृति, काळ-वेळ, शब्द, भाव, felicity, style, इ. -हे त्यांना प्रकर्षाने  जाणवत …. असे आम्ही १२ वर्ष पूर्वी इंदूर येथे green-room मध्ये झालेल्या चर्चेत त्यांच्या तोंडून ऐकले. त्यामुळे त्यांने सास-ननदिया-सौतन-पनघट च्या रटाळ रंगांच्या शिवाय अनेकोनेक इंद्रधनुषी असे रंग प्रचुर मात्रेत वापरले- सास-ननद की नसीहात से बगावत म्हणायची!…मागे असेच काही पंडित जसराज अमीर खुसरो च्या वारसा पलिकडे जायला हवे, असं बोलले होते … जसराज ही शब्दयुति चे master आहेतंच … 

On the lighter side,… freakonomic करण असे, chemically induced तंद्रीत सहजच कलाकार रस्ता विसरेल, तेंह्वा भरपूर direction signboards हवेत, आणि ते सहज प्रदान करंत अभंगांचे शब्द आणि भाव…! no disrespect meant हं! 

मागे मी पंडितजींच्या हाव-भावांवर इंग्रजी ब्लॉग मध्ये काही लिहिले, ते असे… Secret Weapons of Pandit Bhimsen Joshi 

No comments: